Agri

शेतकरी आंदोलन बदनाम करणाऱ्या मंत्र्यांचे डोके तपासा -संदीप जगताप

मुंबई – दिल्लीत गेल्या 18 दिवसापासून थंडी , गारठ्यात शांततेच्या मार्गाने आपलं म्हणणं मांडणारे, हक्कासाठी रस्त्यावर बसलेले शेतकरी नक्षलवादी , आतंकवादी कसे असू शकतात.? शेतकरी आंदोलन बदनाम करणाऱ्या मंत्र्यांनी आपले डोके तपासणे गरजेचे आहे, अशा कडक शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी फटकारले आहे.

भारत कृषी प्रधान देश आहे.शेतकरी बळीराजा ,अन्नदाता आहे.असे सगळेच भाषणं झोडतात.पण त्याच देशात शेतकरी स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला तर त्याला नक्षलवादी , आतंकवादी म्हणायचं, हे दुर्दैवी आहे.सध्या जे कृषी विधेयके चर्चेत आहे.त्यात सुधारणा आवश्यक आहे.असं सगळ्यांचेच म्हणणं आहे. या कृषी विधेयकांवर मतमतांतरेही असू शकतात पण शेतकऱ्यांवर शत्रू राष्ट्रांचे हस्तक असण्याचे, नक्षलवादी , आतंकवादी असण्याचे आरोप दुर्दैवी आहे.

कधी कधी सरकार पाकिस्तानातून कांदा आयात करून इथले भाव पाडतं..आपले पंतप्रधान पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या वाढदिवसाला अचानक पाकिस्तानात जातात..मग आपण त्यांना पाकिस्तनचे हस्तक म्हणायचं का..? शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्याचं सोडून जबाबदार मंत्री वायफळ बडबड करताय .याचा परिणाम आंदोलन चिघळण्यावर होईल.असे संदीप जगताप यांनी म्हटलं आहे.

ही बातमी लगेच शेअर करा ...

Add Comment

Click here to post a comment

Leave a Reply

error: Content is protected !!